Activity 
वाईच्या अध्यक्षपदी श्री. सुरेशदादा कोरडे यांची बिनविरोध निवड

  January 03,2023

  

जनता अर्बन को-ऑप. बँक लि., वाईच्या अध्यक्षपदी श्री. सुरेशदादा कोरडे व उपाध्यक्षपदी श्री. जगन्नाथ कदम (भाऊ) यांची बिनविरोध निवड.

 

वाई :येथील सर्वसामान्यांची व प्रामुख्याने ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असणा-या आणि जनतेची जनतेसाठी व     जनतेबरोबर ह्या बिरुदावलीनुरुप काम करणारी सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य अर्थसारथी असणा-या जनता अर्बन को-ऑप. बँकेची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीकरिताची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली आहे. मा. संचालक मंडळाची विशेष सभा सोमवार दि.०२ जानेवारी २०२३ रोजी अध्यासी अधिकारी तथा वाईचे सहाय्यक निबंधक श्री.जी.टी.खामकर यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अध्यक्षपदी बँकेचे संस्थापक-संचालक श्री.सुरेशदादा कोरडे वाई यांची आणि उपाध्यक्षपदी श्री. जगन्नाथ पांडुरंग कदम (भाऊ) पसरणी यांची बिनविरोध निवड झालेचे अध्यासी अधिकारी-निवडणूक अधिकारी श्री.जी.टी.खामकरसाहेब यांनी जाहीर केले.
निवड झालेनंतर अध्यासी अधिकारी तथा वाईचे सहाय्यक निबंधक श्री.जी.टी.खामकरसाहेब यांनी नूतन अध्यक्ष श्री.सुरेशराव कोरडे आणि नूतन उपाध्यक्ष श्री. जगन्नाथ कदम यांचे अभिनंदन करून त्यांना बँकेच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छ्i दिल्या. मा. आमदार श्री. मकरंदआबा पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा. अध्यक्ष श्री. नितीनकाका पाटील यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.      
या विशेष सभेस नवनिर्वाचित संचालक सौ.सुनंदा फरांदे, बळीराम जगताप, महेंद्र जमदाडे, शेखर फरांदे, निळकंठ मोरे व बँकेच्या सर व्यवस्थापिका सौ.रुपाली बुलुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्री.सुरेशराव कोरडे यांची अध्यक्षपदी आणि .श्री. जगन्नाथ कदम यांची उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांना सर्व संचालक, कर्मचारी वृंद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी तसेच बँकेचे सन्मानिय सभासद व सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पिसाळ, दिपक ननावरे (माजी पंचायत समिती सदस्य), महेश गायकवाड, नितीन इथापे, संतोष जमदाडे, रुपेश शिंदे, संतोष पिसाळ, युवराज गायकवाड, संदिप कोरडे, चंद्रकांत बुलुंगे, शंकर साळुंखे, शशिकांत कोरडे, डॉ. दौंड, हणमंत चव्हाण, नारायण चव्हाण, दादासाहेब गायकवाड, धनंजय चव्हाण, अविनाश चव्हाण(सर), राजेंद्र जमदाडे आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
श्री.सुरेशराव कोरडे आपल्या निवडीबद्दल बोलताना म्हणाले, नूतन उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद व हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहीन. बँकेचा नावलौकीक वाढविण्यास निश्चित मदत करेन. बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून बँकेची सर्वागीण प्रगती लवकरच सर्वांना पाहायला मिळेल, अशी श्री. कोरडे यांनी ग्वाही दिली.